Press "Enter" to skip to content

गोमाशी ते तोरंकेवाडी रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी

तोरंकेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळाची आमदार अनिकेत तटकरेंना साकडे




सिटी बेल | पाली | पूनम सावंत |


सुधागड तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय  झालीय. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी सातत्याने होते. गोमाशी ते तोरंकेवाडी हा रस्ता चांगल्या प्रकारे बीबीएम करून डांबरीकरण करण्यात यावा या मागणीचे निवेदन सोमवारी (ता. 20) आमदार अनिकेत तटकरेंना पालीत एका कार्यक्रमावेळी देण्यात आले. तोरंकेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळाच्या वतीने सुधागड/रोहा नवगांव मराठा समाज सेवा संस्था यांच्यातर्फे ही मागणी करण्यात आली आहे.    

गोमाशी ते तोरंकेवाडी या रस्त्याची खूप दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. आजारी व्यक्तीला दवाखाण्यात नेतांना खूप त्रास होतो. शिवाय खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून भार्जेवाडी ते हंडेवाडी हा 1 कोटी 90 लाख रुपयांचा रस्ता झाला आहे. मात्र हा रस्ता नादुरुस्त राहिला आहे. त्यामुळे तो दुरुस्त व्हावा असे निवेदनात म्हंटले आहे. निवेदन देतेवेळी अध्यक्ष प्रकाश मांडवकर, उपाध्यक्ष अशोक चोरघे, सचिव जयेंद्र उफाळे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.