Press "Enter" to skip to content

दिवगंत ज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे कुटूंबियांचे आ.रविशेठ पाटील यांच्याकडून सांत्वन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

नागोठण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व रायगड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवीनभाई सोष्टे यांचे २२ जुलै, २०२१ रोजी निधन झाले होते. याच पार्श्वभूमीवर पेण-सुधागड विधानसभा मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी दिवंगत पत्रकार नवीनभाई सोष्टे यांच्या नागोठण्यातील निवासस्थानी भेट देऊन सोष्टे कुटूंबियांचे सांत्वन केले.

आ. रविशेठ पाटील यांनी सोष्टे कुटुबियांच्या घेतलेल्या या सांत्वनपर भेटीत संपूर्ण सोष्टे कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी नवीनभाई सोष्टे यांच्या पत्नी किशोरी सोष्टे, मुलगा सिध्दार्थ सोष्टे, केतन सोष्टे, भाऊ बिपिनचंद्र सोष्टे, माधुरी सोष्टे, डाॅ. नरेश सोष्टे, अजय साळुंखे, ध्रुव सोष्टे, ओंकार सोष्टे, भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सिराजभाई पानसरे, सुभाष पाटील, संतोष लाड, दादर ग्रामपंचायतीचे सरपंच मोहन नाईक, आ. रविशेठ पाटील यांचे स्वीय सहाय्यक लक्ष्मण जांभळे, भाजपा रोहा तालुका महिला मोर्चा चिटणीस अपर्णा सुटे, नागोठणे विभाग महिला मोर्चा अध्यक्षा श्रेया कुंटे, उपाध्यक्षा शितल नांगरे, नागोठणे शहर सरचिटणीस संज्योती लाड, मुग्धा गडकरी, सोनाली करडे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.