Press "Enter" to skip to content

गोरगरीब आदिवासी गरजू बांधवांना किराणा सामानाचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

डॉ.गुरुमीत राम रहीम सिंहजी इंसा यांच्या गुरु गादी महिन्याच्या औचित्य साधून डॉ. गुरुमित राम रहीम इंसा यांच्याकडून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यामध्ये निराधार मुलींचे लग्न, रक्तदान ,अन्नदान ,गोरगरिबांना किराणा सामान गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक पेन व स्कूल बॅगचे वाटप, निराधारांना घर बांधून देणे ,असे असंख्य कार्यक्रम वर्षभर राबवीत असतात.

या सामाजिक कार्यक्रमाचा भाग म्हणून डॉ. गुरुमित राम रहीम चा भक्तांकडून शाह संत नामजी परमसुख आश्रम चौक कलोते मोकाशी येथे पंधरा गरजू गरीब आदिवासी परिवारांना एक महिन्याचे जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

गुरुमीत डॉ. राम रहीम सच्चा सौदा च्या 45 गुरुदयाल इंसा यांनी आपल्या स्वखर्चाने हे सामान गोरगरीब परिवारांना वाटप करण्यात आले.यावेळी पंजाब हरियाणा येथून आलेले भक्त जगरूप इंसा, हरचरण इंसा, ब्रह्माचारी बंता इंसा ,कृष्णकुमार कुंडू सतविर इंसा, जनार्दन हिंसा, सतपाल इंसा ,राकेश इंसा ,पुरणमल सुरजीत इंसा व महिला भक्त अनु, सुनिता ,मोनिका, शालिनी, कामिनी इंसा आदी भक्तगणासह गोरगरीब आदिवासी बांधव उपस्थित होते.यावेळी गोरगरीब गरजू आदिवासी बांधवांच्या परिवारांने डॉ. गुरु राम रहीम इन्सा भक्तांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.