कर्जत तालुक्यात एक गाव एक पक्ष एक झेंडा… राष्ट्रवादी पुन्हा !
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोपलेवाडी संपूर्ण गावाने एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.
माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत.

तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावे, आदिवासी वाडी यामध्ये अनेक विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून भोपलेवाडी येथील संपूर्ण गावाने एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. गावातील विकासकामांसाठी एकत्र येऊन आपल्या गावचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णयाचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीने कौतुक केले आहे.
या प्रसंगी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष भगवान चंचे, नगरसेवक शरद लाड, युवा नेते सागर शेळके तसेच नांदगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Be First to Comment