सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
माथेरानला पर्यटक पैसे खर्च करून राहयला येतात अशा पर्यटन स्थळी शासकीय सेवा करण्याची मिळालेली संधी मुख्याधिकारी भणगे यांच्या साठी पर्वणी असून त्या कामाची छाप नक्की पाडतील असा विश्वास खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी व्यक्त केला.
खालापूर नगरपंचायतींच्या मावळत्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांना निरोप आणि नव्या ने पदभार घेतलेल्या रश्मी चव्हाण राठोड यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन नेताजी पालकर सभागृह खालापूर येथे करण्यात आले होते. खालापूर नगरपंचाय येथे सतरा महिने मुख्याधिकारी म्हणून भणगे यांनी उत्तम सेवा बजावली.आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात राहते त्याप्रमाणे पहिले नेमणूकीचे ठिकाण म्हणून खालापूरचा कधी विसर पडणार नाही असे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.
खालापूर शहराच्या विकासासाठी मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांनी दिलेली मोलाची साथ कायम स्मरणात राहील असे कौतुक माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी केले. बदली हि शासकीय नोकरीत प्रक्रिया असून बदली झाली तरि खालापूरशी असलेले नात कायम राहिल अशी भावना सुरेखा भणगे शिंदे यांनी व्यक्त केली.
निरोप समारंभ कार्यक्रमाला नायब तहसीलदार कल्याणी कदम मोहिते, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संतोष जंगम, लायन्स क्लब खोपोली अध्यक्ष महेश राठी, सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ, व्यापारी संघटना खालापूर अध्यक्ष नरेंद्र शहा, माजी नगरसेविका कांचन गव्हाणकर, मंगला चाळके, खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅक्टर अनिल कुमार शहा, पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर आणि खालापूर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले.







Be First to Comment