सिटी बेल | पाली | पूनम सावंत |
आर्थिकदृष्ट्या सक्षम व राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रसाद नारायण कुथे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. या निमित्त झोतिरपाडा बेणसे शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना विभागीय नेते अशोक भोय यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी माजी सरपंच व विद्यमान सदस्य सौ रेखा साबळे,कामगार नेते अरुण कुथे ,सम्यकचे अध्यक्ष चंद्रकांत अडसुळे बेणसे बेणसे शाखा प्रमुख मोहन भोय , झोतिरपाडा शाखा प्रमुख मोहन पाटील,ग्रामपंचायत सदस्य सौ प्रणाली पुंडलीक कोळी , बेणसे उपसरपंच संतोष अडसुळे, सौ. रोहीणी आल्हाट, सदस्य विश्वनाथ उत्तेकर सदस्य अक्षता पाटील, संजय भोय, बशीर मांढरे,विजय भोय,माजी सदस्य सीताराम पाटील,विजय भोय,माजी सदस्य सौ वासंती अशोक भोय, संतोष कोळी, सुधार वारगे, महेंद्र तरे, शिवसेना युवाधिकारी अमोल भोय , पुंडलीक कोळी आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी अशोक भोय अरूण कुथे आणि चंद्रकांत अडसुळे यांनी आपल्या मनोगतातून गावाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाबाबत महत्वपूर्ण भूमिका मांडण्यात आली.







Be First to Comment