Press "Enter" to skip to content

बोर्ली येथील शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपमध्ये : जिल्हाध्यक्ष ऍड.महेश मोहिते यांच्या उपस्थितीत प्रवेश

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर खुश होत मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारा पक्ष आहे.ह्या पक्षानेच कोळी बांधवला आमदार केले.आजपर्यंत इतर पक्षाच्या नेत्यांनी फक्त स्वार्थासाठी वापर करीत पुन्हा वाऱ्यावर सोडून दिले. त्यांच्या या कार्यप्रणालीला कंटाळून अखेर भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.

यावेळी बोर्ली येथील शेषनाथ कानुगोजे, संजय ( दादा) पाटील, प्रजोत हवालदार, अमर सोडेकर, श्री. आशीष हासपाटील व मंगेश भोईर यांनी जिल्हाध्यक्ष ऍड.महेश मोहिते यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

प्रसंगी मुरूड तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर,महेश मानकर, सरचिटणीस प्रवीण बैकर,बोर्ली ग्राम पंचायत सदस्य गणेश कट ,नरेश वारगे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.