Press "Enter" to skip to content

केळवणे येथे संरक्षण भिंतीचा भुमिपुजन सोहळा संपन्न

पनवेल पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या संयुक्त निधीतून होत आहे काम

सिटी बेल | केळवणे |

केळवणे गावातील वाघेश्वर टेकडीवर जाण्याचा रस्ता अतिशय खराब झाला असून तो वेळीच दुरूस्त केला नाही तर भविष्यात कोणताही अपघात होण्याचा धोका नाकारू शकत नाही हे लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दशरथ घरत व पनवेल पंचायत समिती सदस्या मनिषा ज्ञानेश्वर मोरे यांनी आपल्या संयुक्त निधीतून या रस्त्याच्या संरक्षणासाठी चार फुटीची भिंत बांधण्याचे योजले आहे.

केळवणे हे पंचक्रोषीतील सर्वात मोठे गाव असून त्यातील अवघ्या वाघेश्वर टेकडीवर दिडशे घरांची वस्ती असून त्यांच्या वाहनांच्या वाहतूकीमुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे, त्यातच आता रस्त्याच्या चौपदरी रूंदीकरणामूळे रस्त्याच्या बाजूची माती ढासळून रस्त्यावरून वाहतूक करणे धोकेदायक झाले आहे. या अगोदर कित्येक वेळा स्थानिक तरूणांनी आपल्या स्वखर्चाने या रस्त्याचे दुरूस्तीकरण केले आहे.

स्थानिकांची विनंती आणि ही समस्या लक्षात घेवून रा.जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि पनवेल पंचायत समितीच्या सदस्या मनिषा मोरे यांच्या संयुक्त निधीतून रविवार दिनांक १९ रोजी संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

शे.का.प.चे वरिष्ठ कार्यकर्ते हिराजी शंकर शिवकर यांच्या शुभ हस्ते झाली
तर पनवेल शे.का.प.चे सरचिटणिस ज्ञानेश्वर मोरे व ज्ञानेश्वर घरत यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरूवात केली. तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देतांना लवकरच गावात उपकेंद्र ,तलाव सुशोभिकरण व इतर रस्ते यांवर काम करण्यात येतील असे सांगितले .

या कार्यक्रमाच्यावेळी सरपंच अश्विनीताई घरत,उपसरपंच रेश्मा गावंड ,माजी सरपंच दामाजी शिवकर ,गुरूराज ठाकुर ,प्रकाश शिवकर ,तेजश पाटील ,दत्तात्रेय शिवकर आदी मान्यवरांनी उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढविली .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.