Press "Enter" to skip to content

शिक्षक संजय होळकर, विद्याधर पाटील राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

ठाणे दैनिक जीवनदीप वार्ता च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कार 2021 नुकताच जाहीर झाला होता.या पुरस्काराचे वितरण आज शनिवार दिनांक 18/9/2021 रोजी जीवनदीप महाविद्यालयात गोवेली टिटवाळा ठाणे या ठिकाणी मोठया उत्साह पूर्वक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनजी कथोरे मुरबाड मतदारसंघ तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, गोपाळ लांडगे-जिल्हाप्रमुख शिवसेना, रविंद्र घोडविंदे, विजय यादव, जीवनदीप वार्ता रायगड जिल्हा प्रतिनिधी धिरेंद्र ठाकूर असे विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा पूजन व दीपप्रज्वलन तद्नंतर कलर मराठी वाहिनी वरील नवोदित गायिका नेहा हिच्या सुंदर ते ध्यान या अभंगाने करण्यात आली. मान्यवरांच्या सत्कार समारंभात या सुंदर कार्यक्रमाचे आयोजक जीवनदीप वार्ताचे कार्यकारी संपादक रविंद्र घोडविंदे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

एकूण 35 शिक्षक बंधू भगिनींना तर 5 शैक्षणिक संस्था यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये शिक्षक संजय जयराम होळकर-रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई ता.उरण जि रायगड तसेच शिक्षक विद्याधर पाटील- रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल,तालुका पनवेल यांच्या कार्याची दखल घेत यंदाचा राजस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये शाल,ट्रॉफी, सन्मानपत्र व प्रत्येकाला पूजनीय असे तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.

शिक्षक म्हणजे देशाचा कणा आहे. कोरोना काळात शासन देईल ती जबाबदारी स्वीकारत असून भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन यांचे अग्निपंख या पुस्तकात मांडलेल्या मुलाखतीचा पुनरुच्चार करत त्यांनीही म्हटले आहे की मला शिक्षकच व्हायला आवडेल.एवढी पवित्र सेवा कोणत्याही क्षेत्रात नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनात अंधार नाहीसा करून प्रकाश निर्माण करण्याचे पवित्र कार्य शिक्षकच करतो असे मत विविध मान्यवर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन विश्वनाथ पाटील (राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदक विजेते) यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट रीतीने करणारे विजय यादव (संपादक जीवनदीप वार्ता) व जीवनदीप महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य त्यांची पूर्ण टीम यांनी यांनी खूपच मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
सदर पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक संजय होळकर व विद्याधर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शिक्षक संजय होळकर, विद्याधर पाटील यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.