Press "Enter" to skip to content

माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे पोयनाड येथे निर्माल्य संकलन व स्वच्छता

सिटी बेल| पोलादपूर | शैलेश पालकर |

माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत पोयनाड येथील बाजारपेठ तलावामध्ये पडलेला भरपूर कचरा, निर्माल्य, व आजूबाजूच्या परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा हे सर्व गोळा करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आले.

यासाठी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर अलिबाग व नवकला कृती फाउंडेशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आज निर्मल गणेशोत्सव कार्यक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली रायगड जिल्हा सीईओ डॉ. किरण पाटील यांच्या आवाहनानंतर माणुसकी टीम तसेच रायगड जिल्ह्यातील बरेच अशा संस्था निर्मल गणेशोत्सव साजरा करत आहेत तर त्यापैकी एक हा कार्यक्रम आहे, यामध्ये स्वच्छता व आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करून बरेचसे कार्यक्रम राबवण्यात आले.

माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान व नवकला कृती फाउंडेशन रायगडचे श्री देवेंद्र केळुसकर यांच्या पुढाकाराने आज पोयनाड येथील बाजारपेठ तलावाच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा परिषदेकडून जयवंत गायकवाड भेट देऊन सिईओ डॉ. किरण पाटील व डेप्युटी सीईओ डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या तर्फे योग्य ते मार्गदर्शन करून तसेच श्रमदानात हातभार लावून पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी गावात किंवा आजूबाजूला कचरा टाकू नये व कोरोनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा व रोगराई पूर्ण घालवावी याबद्दल मार्गदर्शन केले.

या श्रमदानास माणुसकी कार्यकारी अध्यक्ष तानाजी आगलावे, उपाध्यक्ष सतीश कणसे, सदस्य ऋषिकेश वाडकर, दीपक म्हात्रे, राजू प्रसाद, सुधाकर निषाद, उमेश वाळंज, संजय काळेल, विकास मेटकरी, वरद आगलावे, विकास खैरनार, तसेच नवकला कृती फाऊंडेशनचे देवेंद्र केळुसकर,कौतुक निळकर, निलेश थळे, रीनेश गावित , राकेश जाधव आदि सदस्य व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. चहा पाण्याची व्यवस्था रायगड पोलिस विकास खैरनार यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.