Press "Enter" to skip to content

समुद्र किनारी आलेल्या तेलाच्या तंवगाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

रायगड जिल्हयातील मुरूड,उरण अलिबाग आदींसह रत्नागिरी जिल्ह्यातील काही समुद्र किनारी तेलाचे तवंग

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

काही दिवसापुर्वी रायगड जिल्हयातील काही समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात तेलाचे तंवगआल्याने समुद्र किनारा विद्रुप झाला आहे.याबाबतची माहिती प्रशासन वर्गाला मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांनी समुद्र किनारी जाऊन पाहणी केली.असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले की,रायगड जिल्हयातील मुरूड,उरण अलिबाग आदीसाहित रत्नागिरी जिल्ह्यातील काही समुद्र किनारी तेलाचे तवंग मोठ्या प्रमाणात आले आहे.सदर तंवग हे कशामुळे आले याची माहिती घेण्याची सुचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी यांना दिली होती.

सदर ठिकाणी प्रदुषण मंडळाचे अधिकारी यांनी भेट दिली आहे.तसेच प्रदुषण मंडळाचे अधिकारी यांनी भारतीय तटरक्षक दल यांना याबाबत उपाय योजना करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.त्याचप्रमाणे महाड येथील औद्योगिक विकास महामंडळ मधील लक्ष्मी इंडिस्ट्रीज चे ऑईलचे बॅरल हे समुद्रात वाहून गेले होते.लक्ष्मी इंडिस्ट्रीजचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी पाहणी केली आहे.

महाड येथील औद्योगिक विकास महामंडळामधील लक्ष्मी इंडिस्ट्रीजचे ऑइल बॅरलवाहून गेले होते.त्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ऑईल वाहून आले असून, किनारा मोठ्या प्रमाणात विद्रुप झाला आहे.220 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून, पूर्वीपेक्षा यावेळी ऑइल येण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्याने दगडाच्या संरक्षक भिंतजवळ फक्त ऑईलच दिसून येत आहे. खोल समुद्रातून वाहून आलेले ऑईल वाळूत मिसळल्यामुळे त्याचे गोळे तयार झाले आहेत. ते किनार्‍यावर पसरल्याने एकूणच तेथे बकाल स्वरुप आले आहे. समुद्रात ऑईल आल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. समुद्र किनारी येणार्‍या ऑईलचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मच्छीमारांनी शासनाकडे केली आहे.

मुंबईतील खोल समुद्रात ऑईल कंपन्यांच्या तेल विहिरी आहेत. तेथून गळती झाल्यास असे ऑईलचे तवंग समुद्र किनारी येत असतात. तेल कंपन्यांकडून मच्छीमारांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मुरुड समुद्र किनारी डांबर सदृश्य चिकट आणि जाडसर ऑईल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली आहे. खोल समुद्रातील मासेमारी सध्या बंद असली तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समुद्र किनारी जाळी टाकून मासेमारी केली जाते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.