Press "Enter" to skip to content

चोरी करणाऱ्या आरोपीस कर्जत न्यायालयाने सुनावली 15 दिवसाची शिक्षा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे संजय नगर दहीवली येथील एका पान टपरी मध्ये अज्ञात इसमाने चोरी करून त्यामधील रोख रक्कम पळून नेली होती, कर्जत पोलिसांनी अवघ्या दोन तासात अज्ञात चोरट्याला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 दिवसाची शिक्षा सुनावली आहे.

कर्जत पोलिस ठाण्यातच्या हद्दीत मौजे संजय नगर दहिवली येथील संभाजी विठ्ठल दिघे यांचे हर्ष पानटपरी मधील दुकानातील स्टीलच्या पेटीतील 1300/- रुपयांची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पान टपरी मधून चोरून नेली होती, मालक संभाजी दिघे यांनी फिर्यादी दाखल केली होती, कर्जत पोलीस ठाण्यामध्ये कॉ. गु. र. क्र. 246/2021 भा.द.वि. कलम 380 अन्वये प्रमाणे 13 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अंमलदार गणेश पाटील, पोलीस अंमलदार अश्रुबा बेंद्रे हे तपास करीत होते.

तपास हे करीत असताना सध्या संजयनगर येथे अशोक शंकरअप्पा लकानी (वय-28) मूळचा राहणारा आंदोला तालुका जेवरगी जिल्हा गुलबर्गा कर्नाटक मधील आहे याने सदरचा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्या कर्जत पोलिसांनी सदर इसमास अवघ्या दोन तासाच्या आत चौकशीकामी त्याला ताब्यात घेतले, सदर गुन्हा बाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात कबूल केले.

चोरीतील आरोपी अशोक शंकरप्पा लकानी याला दोषारोपपत्र सह कर्जत न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपीस न्यायालयाने 15 दिवसाची शिक्षा सुनावली असून आरोपी सध्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.