अलिबाग भाजपा चे वतीने ओबीसी चे न्याय हक्कासाठी आंदोलन
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
ओबीसी आरक्षणासाठी मा न्यायालयाने मागितलेला इंपेरिकल डेटा अगोदर उपलब्ध करून दिला नाही आणि न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर ते पूर्वरत करण्यासाठी आयोग गठीत करून इंपेरिकल डेटा गोळा करण्यात कुचराई केली. आता पुन्हा न्यायालयाने आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा निकाल दिल्याने स्थानिक स्वराज संस्थाच्या पोटनिवडणुका आरक्षणाविना पार पडण्याची प्रकिया सुरु झाली आहे.
आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचे सुद्धा हक्काचे आरक्षण गेले आहे. सरकार केवळ वसुली करण्यात व्यस्त राहिल्याने सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत असे मत भारतीय जनता पक्षाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष ऍड.महेश मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर व्यक्त केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैंनाडे यांच्याकडे ऍड.महेश मोहिते आणि भाजपचे कार्यकर्ते यांनी निवेदन सादर केले.








Be First to Comment