Press "Enter" to skip to content

पनवेचे तहसीलदार विजय तळेकर यांना पितृशोक

सिटी बेल | पनवेल |

पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांचे वडील शिवाजीराव जनार्दन तळेकर यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. या वृत्तानंतर तळेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी रीघ लावली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील शेतकरी आणि प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेले शिवाजीराव तळेकर हे अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.

श्री दत्त भक्त आणि परंपरा सांभाळत त्यांनी पंचक्रोशीत आध्यात्मिक वातावरण निर्माण केले होते. खोपोलीचे ब्रह्मलीन चैतन्यनाथ श्री गगनगिरी महाराज यांचे ते निष्ठावंत भक्त होते. गुरु-शिष्याचे नातेही मधुर राहिले होते. त्यामुळे आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात शिवाजीराव यांचे भरीव योगदान राहिले आहेत.

त्यांना तीन मुले आणि एक विवाहित कन्या आहे. तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोलापूर येथील कृषी अधिकारी पदावर त्यांचा एक मुलगा कार्यरत आहे. दुसरा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देत असून शिवाजीरावांचा वारसा जपत आहे. तर विजय तळेकर हे पनवेलचे तहसीलदार आहेत. अतिशय प्रतिष्ठित घराणे म्हणून सोलापुरात तळेकर कुटुंबं परिचित आहे.

शिवाजीराव तळेकर यांच्या निधनाने सोलापुरात शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी तळेकर कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.