सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत मध्ये राहणारा कु.गिरीश शशिकांत ठाकरे यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड झाली आहे.
शशिकांत ठाकरे गुरुजी यांचे सुपुत्र कु. गिरीश शशिकांत ठाकरे याची जगविख्यात ‘मॅंचेस्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर- लंडन’ येथे उच्च शिक्षणासाठी प्रयाण झाले आहे
गिरीशचे प्राथमिक शिक्षण शिशुमंदिर कर्जत, माध्यमिक शिक्षण शारदा मंदिर कर्जत, आणि आर्किटेक्चर ची पदवी,भारती विद्यापीठ- नवी मुंबई येथे झाले असून लहानपणापासून उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने अभ्यासात स्वतःला गिरिशने वाहून घेतले होते. त्याची चिकाटी आणि जिद्द आणि अभ्यासू वृत्ती मुळेच त्याला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे मॅंचेस्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर या जगविख्यात प्रवेश मिळाला.
ठाकरे गुरुजी मूळचे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी. नोकरी निमित्त गेल्या 30 वर्षांपासून कर्जत येथे इमाने इतबारे शिक्षकाची नोकरी शशिकांत आनंदा ठाकरे आणि प्रिया शशिकांत ठाकरे हे दोघेही प्राथमिक शिक्षक म्हणून कर्जत तालुक्यात कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्य करता करता स्वतःच्या मुलांवर चांगले संस्कार आणि शिक्षणाचे महत्व दोन्ही उभयतांनी पटवून दिले.
कर्जत सारख्या मर्यादित शैक्षणिक उपलब्धता असणाऱ्या परिसरासाठी गिरीश ची ही प्रेरणादायी निवड आहे. शिक्षणकार्य करत असतांनाच, अर्ध्या रात्री कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणारे, विविध मानांकित पुरस्कारांनी सन्मानित, अशा ठाकरे गुरुजींच्या शिरपेचात हा अजून एक समानाधानाचा तुरा होय.अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कौटुंबिक जबाबदारींत गुरफटल्यामुळे या कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच!!परंतु, त्याची जाण ठेवत बौद्धिक परिश्रम आणि जिद्दं यांच्या जोरावर त्याने शिष्यवृत्ती मिळवली आणि आवाक्याबाहेरची संधी कवेत घेतली, याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
‘मुलांनी काय करावे, यापेक्षा कसे करावे हे शिकवले की ते त्यांचा राजमार्ग स्वतः बनवतात’ हा ठाकरे सरांचा विचार.. तर,लहान असतांनापासूनंच स्वत: च्या घरगुती कामांच्या सवयींतून आई प्रिया ठाकरे यांनी मुलांना स्वावलंबन शिकवले. आणि त्यातूनच त्याचा आत्मविश्वास बळकट होत गेला.
“गिरीश चे सर्व थरातून त्याच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात झालेल्या निवडीबाबत कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना तसेच सामाजिक संघटनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.गिरीशची उच्च शिक्षणासाठी जगविख्यात ‘मॅंचेस्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर- लंडन’ येथे झालेली निवड ही तरुणाईला प्रेरणादायी असल्याचे मत अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष विजय जगताप यांनी व्यक्त केले.”








Be First to Comment