Press "Enter" to skip to content

खा.सुनिल तटकरे यांच्या निर्देशाने रोहयाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक

अडीच वर्षे होती जागा रिक्त ; रोहा तालुका सिटीझन फोरमच्या मागणीला यश

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |

रोहा तालुक्यासाठी असलेले उपअधिक्षक भूमिअभिलेख हे पद गेली अडीच वर्ष रीक्त होते. परिणामी या कार्यालयाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. नागरिकांची ओरड लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख यांनी हा विषय खा. सुनिल तटकरेंकडे मांडून त्यांच्याकडे योग्यतो पाठपुरावा केला. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन खा. तटकरे यांनी संबंधितांना योग्यते निर्देश दिल्याने रोहयाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

रोहयाला तब्बल अडीच वर्षे उपअधिक्षक भुमीअभिलेख पूर्णवेळ नसल्याने जमीन मोजणी इत्यादि जमिनी संबंधित विषयात नागरिकांची मोठी परवड होत होती. तेथे बड्या मंडळींची सर्व कामे सुलभतेने होत असताना सर्वसामान्यांची आणि विशेषकरून शेतकरीवर्गाला मात्र हेतुपूर्वक त्रास दिले जात होते. दरम्यानच्या काळात सिटीसर्वे कार्यालयात दलालाचा राबता वाढला, जमीन मोजणीचे तसेच इत्यादी विषयांत प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी वाढीस लागली. प्रत्येक कामाचे दर ठरले गेले, जी कामे प्रत्यक्ष कार्यालयात वारंवार जाऊन होत नव्हती, ती कामे दलालाच्या माध्यमातून काही मिनिटांच्या अवधीत होऊ लागली.

कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना काही कर्मचाऱ्यांकडून हेतुपूर्वक असहकार सुरू असताना दलालाच्या मार्फत अव्वाच्या सव्वा रक्कमा घेत तीच कामे क्षणभरात होऊ लागली. नागरिकांना होणारी पिळवणूक तसेच कार्यालयाला प्रमुख अधिकारीच पूर्णवेळ नसल्याने या सर्व चुकीच्या गोष्टी सिटीसर्वे कार्यालयात घडत असल्याचे लक्षात आल्याने रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी सदर बाब खा. सुनिल तटकरे यांच्या निदर्शनास आणली. खा. तटकरे यांनी नागरिकांना होणारी पिळवणूक हा विषय गंभीरपणे घेत संबंधितांना तातडीने निर्देश दिले होते. त्यानंतर रोहयाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षक म्हणून नंदकुमार माळवे यांची नुकतीच करण्यात आली आहे.

रोह्यासाठी टीएलआर यांची तातडीने पूर्णवेळ नियुक्ती केल्याबद्दल रोहा तालुका सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांनी खा. सुनिल तटकरे यांचे आभार मानले, गुरुवारी देशमुख यांच्यासह फोरमच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त टीएलआर माळवे यांची भेट घेऊन त्याचे स्वागत केले. यावेळी रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, प्रशांत देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशीकांत मोरे, राजेंद्र जाधव, रविंद्र कान्हेकर, रविना मालुसरे, वरसे उपसरपंच मनोहर सुर्वे, मिलिंद अष्टीवकर आदी उपस्थीत होते.

यावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या वरीलप्रमाणे सर्व विषयांवर माळवे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली, तसेच नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी कार्यालयात मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात यावे अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.