Press "Enter" to skip to content

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपचे प्रांताधिकारी यांना निवेदन

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

राज्यात मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत आंदोलन होत असतानाच आता ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजप पक्ष सरसावला आहे.राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण दिले होते.

या राजकीय आरक्षणामुळे ओबीसी समाजातील अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येत होत्या त्यामुळे समाजाची वाटचाल प्रगतीपथाकडे होत होती. इतर समाजाच्या आरक्षणाबरोबर ओबीसींचा मार्ग मोकळा झालेला वाटत होता मात्र राज्यातील या महाविकास आघाडी सरकारने आपल्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण रद्द करून या समाजाचा विश्वासघात केल्यामुळे हा समाज आपल्या मूलभूत हक्कांपासून तसेच राजकीय क्षेत्रापासून वंचित राहणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने ओबीसींवरील काढलेल्या आरक्षणाचा मुद्दा तात्काळ जाहिर करावा या मागणीसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून आज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष रविकांत म्हात्रे, उपाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस संजय घरत, वाशी सरपंच गोरख पाटील, रविंद्र म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.तर दिलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे निवेदन तातडीने वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल असे तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.