Press "Enter" to skip to content

अखेर..वडखळ-धरमतर रस्त्यावरील खड्डेपोलिसांनी भरले ; संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणा-या वडखळ धरमतर ते अलिबाग या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते या रस्त्यामुळे चाकरमान्यांना जाण्यायेण्याच्या प्रवासात अडथळा येऊ नये या करीता रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. पडणा-या पावसाच्या पाण्यामुळे खड्यात पाणी साचून चिखलय रस्ता होत असल्याने अखेर वडखळ पोलिसांनी सदरचे खड्डे भरून रस्त्याची डागडुजी केली आहे.मात्र या खड्ड्यांमय रस्त्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष जाणवत आहे.

यावेळी वडखळ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ट्रॅक्टर,जेसीबीच्या साहाय्याने त्यावर खडी टाकून सदर रस्ता वाहनांसाठी मोकळा केला आहे.याकरीता साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोर, साहाय्यक फौजदार पाटील, पोलीस नाईक अमोल म्हात्रे, पोलीस नाईक दिनेश भोईर आदिंनी याकरिता मेहनत घेतली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.