Press "Enter" to skip to content

लोना कंपनीतील तिघा अधिका-यांचा वाढदिवस एकत्रित साध्या पद्धतीने साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.तिसरी कोरोना लाट येण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ज्ञांनी भाकित वर्तवले आहे.कोरोना संसर्गाने सणांवर ही नियमांचे बंधन आल्याने सणही साध्या पद्धतीने साजरे होताना दिसत आहेत.

यातच रसायनी गुळसुंदे येथील लोना कंपनीच्या तिघा वरिष्ठ अधिका-यांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने एकत्र येऊन साजरा केला. यावेळी लोना कंपनीचे मॅनेजर गणेश मेणसे, लोनाचे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर एस आर गुप्ते , लोनाचे सीनियर मेन्टेनन्स इन्चार्ज वसंत सोमण या तिघांनी एकत्रित येऊन वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी रसायनी पाताळगंगा परिसरातील ‌जेष्ठ समाजसेवक तथा सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड उपस्थित होते.यावेळी अकाउंट विभागाचे संजय फडके, मारुती सुंबे ,टाइम ऑफिसचे रुपेश कदम,प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.कोरोना काळात आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता साध्या पद्धतीने साजरा करा असे आवाहन जेष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.