Press "Enter" to skip to content

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रोठ खु.येथे वृक्षारोपण

एकूण ८३ प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने रोहे तालुक्यातील रोठ खु.येथील स्मशानभूमी हद्दीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

गुरू.१६ सप्टें.रोजी रोठ खु.येथील स्मशानभूमी क्षेत्र परिसरात रोहे श्री. बैठकीतील कमीत कमी सदस्यांच्या उपस्थितीत व कोरोना नियमावलीचे पालन करून सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला.यावेळी स्मशानभूमी परिसरात एकूण ८३ प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

यामध्ये विशेषतः आंबा, चिंच,जांभूळ, बेल,करंज, अशोक,बदाम,काजू आदी वृक्षांच्या रोपांचा समावेश करण्यात आला आहे. तर लागवड केलेल्या रोपांभोवती ग्रीन नेटच्या माध्यमातून सुरक्षित संरक्षणही करण्यात आले आहे.तर व्रुक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी श्री. सदस्यांमध्ये मोठाच उत्साह दिसून येत होता व सदरील वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न करण्यात आला.

यावेळी ग्रा.सेवक दत्तात्रेय सावंत,सरपंच गीता मोरे,उपसरपंच महेंद्र कांबळे,सदस्य सचिन मोरे व अन्य ग्रा. पं.सदस्यांसह लिलाधर मोरे,रमेश मोरे,हरिश्चंद्र मोरे,लक्ष्मण मोरे,राकेश कर्णेकर आदी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.