Press "Enter" to skip to content

शिवकृपा गौरा मंडळ खोपटे आयोजित रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिटी बेल । खोपटे। अजय शिवकर ।

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवल्या नंतर , राज्याची परिस्थिती कशीबशी सावरू लागली आहे मधले हे दोन वर्ष अत्यंत नाजूक गेले. पण अजूनही कोरोना हद्पार झाला नाही त्यामुळे कमी पडणारा रक्तपुरवठा लक्षात घेता उरण तालुक्यातील शिवकृपा गौरा मंडळ खोपटे आयोजित सध्या कोव्हीड रुग्णांना, रक्तपुरवठा कमी पडू नये म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन, रक्तदान करण्याचे आवाहन मंडळा कडून करण्यात आले होते. शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने खोपटे गणपती मंदिर येथे शासनाच्या नियमानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

८० वर्षापूर्वी चालु करणाऱ्या या मंडळाचे मुख्य संस्थापक वा इतर सहकारी यातील कोणीही सध्या जिवित नसतानाही त्यांच्या मागे नवतरूण वर्गाने अगदी कौशल्यपुर्वक व्यवस्थापनेने समाजसेवेचे धोरण सांभाळून हा मंडळ चालू ठेवला आहे, दरवर्षी नवनवीन प्रबोधनाकारी चित्रदर्शन ही त्यांची विशेष खूबी. तसेच गरजूंना मदत ,मागासवर्गियांना अन्यधान्य वाटव व इतर अनेक सेवा त्यांनी कोरोना काळात दिल्या गेल्या महिन्यातील पुरग्रस्तांनाही त्यांनी विशेष मदत केली .

श्री साई ब्लड सेंटर कळंबोळी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातील डाँ. राजेश आतर्डे,डाँ. दिपक ठोकल ,आशिष मोहिते, रशिद खान,मनोज जाधव यांनी आपले बहुमुल्य सहकार्य दिले.

सदर रक्तदान शिबिराचे नियोजन मंडळअध्यक्ष देवेंद्र विनायक पाटील ,कार्याध्यक्ष युवराज गिरिधर पाटील व इतर सदस्य मंडळाने यथायोग्य पार पाडले. तसेच या कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमात सहकार्य करून शोभा वाढविली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.