Press "Enter" to skip to content

पोलादपूरातील धामणदिवी ग्रामपंचायत कार्यालयाचे महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्याहस्ते उद्घाटन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

स्व.माणिकराव जगताप यांच्या पश्चात पोलादपूर तालुक्यातील विविध विकासकामांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहू, तालुक्यातील मतदारजनता तसेच स्व.माणिकरावांच्या प्रशंसकांना साथ देऊ, अशी ग्वाही महाडच्या नगराध्यक्षा तथा प्रदेश काँग्रेस सचिव स्नेहल माणिक जगताप यांनी येथे दिली.

तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखालील एकमेवाद्वितीय असलेल्या धामणदिवी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उदघाटन तसेच स्व.माणिक जगताप सभागृह आणि स्मशानशेडचे उदघाटन महाडच्या नगराध्यक्षा तथा प्रदेश काँग्रेस सचिव स्नेहल माणिक जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. या विकास कामांची पूर्तता माजी आमदार स्व.माणिकराव जगताप यांच्या प्रयत्नांतून झाली आहे.

यावेळी महाड विधानसभा काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय सलागरे, महाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजुशेठ कोरपे, उपसभापती शैलेश सलागरे, माजी सभापती आणि माजी सभापती व पं.स. सदस्य दिपीका दरेकर, माजी सभापती दिलीप भागवत, कृष्णा कदम, मोहन शिंदे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण महाडिक, शहर अध्यक्ष अमोल भुवड, तालुका सरचिटणीस योगेश शिंदे, विभाग अध्यक्ष नामदेव शिंदे, प्रदीप नरे, साईनाथ शिंदे, कमलाकर पार्टे, महेश दरेकर, अशोक साळुंखे तसेच बांधकामाचे ठेकेदार आणि काँग्रेसचे पुणे येथील युवा कार्यकर्ते सचिन पार्टे, वैभव जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम चव्हाण, पुणे मंडळ अध्यक्ष अशोक कदम, धामणदिवीचे सरपंच शांताराम पारदुले व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अजय सलागरे, दिलीप भागवत, शैलेश सलागरे,दीपिका दरेकर, शांताराम पारदुले,इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी धामणदिवीतील माजी सरपंच, ग्रामस्थ तसेच महिला मंडळ आणि कुणबी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.