Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यातील गोवे येथील तरुणांनी जोपासला महाभारत काळातला सारिपाटाचा खेळ

गणेश उत्सवापासून दसऱ्या पर्यंत जागरण करताना रंगतोय सारीपाटाचा डाव

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

गणेश उत्सवामध्ये जागरण म्हणून परिचित असणारे सर्व खेळ हळूहळू लोप पावत असतांना गोवे येथील तरुणांनी आधुनिक काळात ही सारिपाटाचा खेळ जोपासला आहे. कौरव पांडवा पासून चालत आलेला सारिपाटाचा खेळ हा गणेश उत्सवा पासून दसऱ्या पर्यंत जागरण म्हणून बुद्धीचा वापर करुन खेळण्यात येणारा खेळ हा पुर्ण होण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात.

पिढ्यान-पिढ्या पासून चालत असणारा सारिपाटाचा खेळ हा मोठया बुद्धीचा वापर करुन खेळला जातो. परंतु भावी तरुण पिढी या जुन्या खेळा पासून दूर होत असतांना दिसत आहेत.अशा परिस्थितीत गोवे गावातील या खेळात पारंगत असलेले जेष्ठ नागरिक रामा होनाजी गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ जोपसला जात आहे.

रामा गुजर यांच्या मार्गदर्शना खाली तरुण वर्गातील लीलाधर दहिंबेकर, प्रशांत गुजर,चंद्रकांत पवार, निलेश दहिंबेकर,जयसिंग पवार,अजित दहिंबेकर,कल्पेश सुर्वे,आकाश दहिंबेकर,साहिल दहिंबेकर,सार्थक दहिंबेकर, हरिचंद्र गुजर,अरुण दहिंबेकर,हे तरुण सारिपाटाचा खेळ आपल्या बुद्धीचा वापर करुन जोपासत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.