शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातून उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणाऱ्या स्वराज सोनावणे ची झेप प्रेरणादायी : विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
जिद्ध, चिकाटी, आत्मविश्वास, कठोर परिश्रमाची तयारी, महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावर स्वराज सोनावणे याने शैक्षणिक दृष्ट्या गरुडझेप घेतली आहे. स्वराज्य सोनावणे बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला जात आहे. शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातून उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणाऱ्या स्वराज सोनावणे ची झेप प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार शुभेच्छापर आयोजित कार्यक्रमास उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काढले.
यावेळी विरेन ठाणगे याला देखील परदेशात (फायनान्स मास्टर डिग्री)उच्च शिक्षणासाठी जातेसमयी शुभेच्छा दिल्या. स्वराज व विरेन हे परदेशातून नामांकित पदव्या संपादन करतील व आपल्या जिल्ह्याचे राज्याचे व देशाचे नावलौकिकात भर घालतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी व्यक्त केला. त्यांच्या हातून समाजहित व राष्ट्रहिताची कामे होतील असा विश्वास शेळके यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
अनिल भातनकर म्हणाले की, संजय सोनावणे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आज शिक्षण महाग झाले आहे, उच्च शिक्षण व परदेशी पदव्या संपादन करणे ही तर दूरची गोष्ट. मात्र आज स्वराज सोनावणे आपल्या ध्येयाने प्रेरित होऊन अपार मेहनतीने यश संपादन करीत आहे. बॅरिस्टर पदवीसाठी परदेशात जाणाऱ्या स्वराज चे कौतुक करावे तितके थोडेच. येत्या काळात तरुणांपुढे आदर्श म्हणून स्वराज उभा राहील असे भातनकर म्हणाले.
डॉ.संजय सोनावणे म्हणाले की, आपले पूर्वज शेती,नोकरी, चाकरी, व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असत.मात्र वाडवडिलांच्या पुण्याईने चांगले आचार विचार संस्काराने आता आपल्या पिढ्या प्रगतीपथावर जात आहेत. स्वराज सोनावणे उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या व देशहितासाठी योगदान देईल हा विश्वास आहे. स्वराज बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला जाणे ही आनंदाची, अभिमानाची व स्वाभिमानाची बाब आहे. सोनावणे कुटुंबीयांचा इतिहास लिहायला घेतला तर लंडनला उच्च शिक्षण घेतलेल्या स्वराज चे नाव अधोरेखीत होईल.असे सोनावणे म्हणाले.
यावेळी स्वराज सोनावणे याने आपल्या मनोगतात बॅरिस्टर होणे हे माझे स्वप्न आहे, या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचे रान करीन, उच्च शिक्षणानंतर समाजहित व राष्ट्र उत्कर्षासाठी मी तन, मन , धनाने योगदान देईन अशी ग्वाही स्वराज ने याप्रसंगी दिली. यावेळी मंदार दोंदे, धम्मशील सावंत, संजय कदम, अनिल भातनकर यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे अध्यक्ष ,ज्येष्ठ समाजसेवक , नामवंत उद्योजक डॉ. संजय सोनावणे, पत्रकार विवेक पाटील,मंदार दोंदे, निलेश सोनावणे, भारत कुमार कांबळे, राजू पाटील, धम्मशील सावंत, राजुशेठ पोहरा, प्रदीप सोनावणे, प्रथमेश सोनावणे, शरद सोनावणे, रुपम सोनावणे, नितीन जोशी, अनिल भातनकर, अशोक काळे, अमेय काळे, रवींद्र भोईर, उत्तम शेळके, ऍड: अमोल शेळके आदि लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र चे सन्माननीय पदाधिकारी,पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे पदाधिकारी, रूद्रवली बौध्दजन विकास संस्थेचे पदाधिकारी एस आर एस ग्रुप चे संचालक व स्टाफ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment