Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद प्रभाग 7 मध्ये लसीकरण शिबिर ; 277 जणांनी घेतला लाभ

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपरिषद प्रभाग क्रमांक -7 मध्ये पाटील आळी परिसर येथे लसीकरण शिबीर संपन्न झाले, या मध्ये 277 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आणि कर्जत नगरपरिषदेच्या पुढाकाराने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक नगरसेविका मधुरा महेंद्र चंदन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पाटील आळी यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.कोव्हीशिल्ड पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.

पाटील आळी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करणात आले होते. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी भेट दिली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र चंदन उपस्थित होते.
डॉ.संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रुपेश लाड, पूनम जगडुळे, रुपाली कांबळे, शाहीन मुजावर, संकेत पाटील, अनिता मक्कु, करण काळे यांनी लसीकरण केले. महेश जाधव, यश ठाकरे, संतोष पिंगळे, महेश सारडा, अक्षय गुप्ता, ऋतिक हरपुडे, पुरुषोत्तम कुलकणी, व्यंकटेश ठाकरे, मलेश भोईर, मनिष सकपाळ, सौरभ म्हसे, नकुल शिंदे, गोटु शिंदे, राहुल भोबु, सौरभ लाड, मकरंद दगडे, प्रखर गुप्ता, नितीन गुप्ता, चैतन्य डावखे,ऋषिकेश हरपुडे या मंडळाच्या सदस्यांनी त्यांना मदत केली.

कोव्हीशिड चा पहिला डोस 240 व दुसरा डोस 37 यामध्ये पुरुष-173 तर स्त्री-104 अश्या 277 जणांनी डोस घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.