Press "Enter" to skip to content

माथेरानचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांची बदली

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

माथेरानचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांची कालावधी पुर्ण होण्या अगोदर तडका फडकी बदली झाल्याने माथेरान मध्ये चर्चेला उधान आले आहे, खालापुर च्या सुरेखा भगणे – शिंदे यांनी माथेरान नगरपालिकेचा पदभार स्वीकारला आहे.

माथेरानचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव हे मे 2020 रोजी माथेरान नगपालिकेचा पदभार स्विकारला होता, अल्पावधीतच त्यांनी माथेरान मध्ये आपल्या कामाचा ठसा ऊमटवला 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादळात त्यांनी आपली भुमिका चोख बजावली, गावात स्वतः फिरवू जन जागृती केली त्यामुळे जिवित हानी झाली नाही.

तसेच कोरोना काळात ही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली माथेरान मध्ये 97 टक्के लसीकरण त्यांनी करून घेतले तर एक ना अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत, असे असताना कार्यकाळ पुर्ण होण्या आधीच त्यांची बदली झाल्या मुळे माथेरान मध्ये उलट सुलट चर्चा रंगली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.