Press "Enter" to skip to content

(title)

जे.एन.पी.टी. आणि केअर पॉईंट हॉस्पीटल डॉक्टरांच्या प्रतिक्षेत. 

उरण चे मरण काही थांबेना


सिटी बेल लाईव्ह/ उरण

उरण तालुका म्हणजे भारतातील सर्वात जास्त उद्योगधंदे असणारा आणि सरकारला सर्वात जास्त महसुल मिळवुन देणारा तालुका असला तरी ह्या तालुक्यातील रूग्णांना मात्र वणवण फिरावे लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने उरण तालुक्यात केअर पॉईंट हॉस्पीटल सुरू झाले. त्यामध्ये Covid Care Centre म्हणजे प्राथमिक अवस्थेत असलेले रूग्णांची सोय झाली. आजपर्यंत ज्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता ते MGM कामोठे आणि उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे पाठवण्यात येत होते. परंतु रायगड मधील इतर तालुक्यातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तेथे देखील रूग्णांना बेड मिळत नाही. हे लक्षात आल्यावर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी मा.जिल्हाधिका-यांपासुन ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांना फोन करून वास्तविकता लक्षात आणुन दिली. हे आणुन दिल्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांनी जे.एन.पी.टी. हॉस्पीटल आणि केअर पॉईंट हॉस्पीटल येथे प्रत्येकी ५० ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्याचे आदेश तातडीने दिले. सध्या केअर पॉईंट हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन बेडसाठी आवश्यक डागडूजी करून आवश्यक साहित्य स्वत: तहसिलदार उरण यांनी लक्ष घालुन त्याची पुर्तता केली आणि म्हणुन आज तीस ऑक्सीजन बेड तयार आहेत. पंरतु तिथल्या ऑक्सीजन व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरची गरज आहे.  तरी आरोग्य विभागाने ताबडतोब आदेश काढून त्या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे, अन्यथा उरणकरांचे मरण अटळ आहे. तर दुसरीकडे जे.एन.पी.टी.ने दोन आठवड्यात ४८ बेड्सची व्यवस्था करतो आणि दोन्ही हॉस्पीटलसाठी आवश्यक डॉक्टर्स आणि स्टाफची नेमणुक करतो असे सांगीतले होते. परंतु तसे काहीही होताना दिसत नाही. उलट  जे.एन.पी.टी. हॉस्पीटल प्रशासन हे केअर पॉईंट हॉस्पीटलवर आपली जबाबदारी ढकलताना दिसत आहे. सध्या  जे.एन.पी.टी. हॉस्पीटलमध्ये अनेक एम.बी.बी.एस. डॉक्टर्स असुन त्यापैकी काही डॉक्टर्स हे भुलतज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ देखील आहेत. परंतु हे सर्व डॉक्टर्स आपली नैतीक जबाबदारी विसरून नको ती कारणे देवुन जबाबदारी पासुन दूर पळत आहेत.  जे.एन.पी.टी. ने जर ठरविले असते तर  जे.एन.पी.टी. हॉस्पीटलमध्ये आत्तापर्यंत २०० बेडचे सुसज्ज असे हॉस्पीटल तयार करू शकले असते. परंतु प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे व डॉक्टर्सच्या बेजबाबदारपणामुळे उरणकरांचे मरण अटळ आहे हे निश्श्चित चित्र दिसत आहे. जर एखाद्या व्यक्तीला बेड मिळाला नाही आणि त्याचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण?

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.