Press "Enter" to skip to content

पावसाची रिपरिप सुरूच, गणेश भक्तांचा हिरमोड

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |

पाच दिवसांच्या गणेश विसर्जनास आज होणार असल्याने पाऊस मात्र गणेश भक्तांची चक्क परीक्षा घेत आहे.हजारो रुपये खर्च करून तयार केलेले देखावे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत गणेश भक्तासाठी सज्ज असले तरी रोह्यात शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी दररोज येणाऱ्या पावसामुळे त्यात मात्र चांगलाच व्यत्यय येत आहे.

गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून पाऊस ठाण मांडून बसला आहे.दररोज दुपारपर्यंत अधून मधून विश्रांती घेणारा पाऊस सायंकाळी मात्र जोर धरत आहे. शहरात काही ठिकाणी गणेशोत्सव मंडळ आहेत.त्या मंडळांनी पावसापासून संरक्षण होईल असे वॉटरप्रुफ मंडप बनविण्यात आले आहेत.मात्र पाऊस सुरू असल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.त्यातच कोरोनाच्या संभाव्य वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत.मंडपापुढे पाणी असल्याने रांगेळी काढणे,मनोरंजन व बौद्धिक कार्यक्रम घेणे आदींबाबत कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे.

सायंकाळी जोरदार सरी कोसळत असल्याने अचानक वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत.त्यामुळे आवश्यक आणि सुरक्षीत असेल तेवढेच दिवे प्रकाशीत केले जातात.तर अंधारलेले वातावरण आणखी निरुत्साहमुळे भाविकही देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत नाही. सार्वजनिक गणेश मंडळा ठिकाणी कायकर्ते कसेबसे मंडपाच्या आडोशाला उभे राहून आरती आराधना करताना दिसतात.

परिणामी घरोघरी प्रत्येक गणेश मंडळाच्या मूर्तीचे कौतुक होत असल्याने आरास व देखावे बघण्यासाठी गणेश भक्तांची उत्सुकता ताणली गेली असताना गणरायांनी आगमन केल्यापासून दररोज सायंकाळी पाऊस झोडपून काढत असल्याने घराबाहेर पडणे देखील अवघड झाल्याने गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडल्याचे पहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.