Press "Enter" to skip to content

आमदार रविशेठ पाटील यांच्याच माध्यमातून तालुक्यातील रस्ते चकाचक : वैकुंठ पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वडखळ विभागासह बोरी शिर्की रस्त्यांकरीता आमदार रविशेठ पाटील यांनी ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून मार्च महिन्यात या रस्त्याचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला होता मात्र आमदारांनी कुठलाच निधी दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे ते पुर्णता खोटे आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्हा परिषदेत मागच्या अनेक वर्षापासून सत्ता असूनसुद्धा वडखळ जिल्हापरिषदेचे सदस्य यांनी वडखळ वाशी या भागाचा विकास न करता नुसत्या वल्गन्या केल्या आहेत.मात्र आमदार रविशेठ पाटील यांच्याच माध्यमातून येथील रस्त्यांसह इतर विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.मागच्या काळात माजी मंत्री असताना सुद्धा त्यांनी पेण तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास मनी धरून तालुक्यातील अनेक गावांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला हे कोणालाही नाकारता येणार नाही.तर आता आमदार निधीतून सुध्दा वडखळ, बोरी, शिर्की, मसद येथील रस्त्यांवर १० लाखांच्या प्रमाणे ४ टप्यात ४० लाख रुपये निधी टाकण्यात आला आहे.मात्र येथील सदस्यांनी विकासकामांना खीळ घालण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणारे काही रस्ते आजही दुरावस्थेत असून याकडे जिल्हा परिषद सदस्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही पण शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते आमदार निधीतून चकाचक होत असल्याचे यावेळी वैकुंठ पाटील यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.