Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याने जासई गव्हाण रस्त्याची तातडीने दुरुस्ती

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याला जोडणारा महत्वाचा जासई -गव्हाण रस्ता PWD (अलिबाग )व सिडको यांच्या कात्रीत सापडले असतांना या रस्त्या बद्दल अनेक तक्रारी करून सुद्धा हा रस्ता होत नव्हता.या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता दाट आहे. रस्त्यात खडा आहे कि खड्यात रस्ता आहे. याचा अंदाज या मार्गांवरून प्रवास करणारे स्थानिक प्रवासी, रिक्षा चालक, चारचाकी वाहनधारक व बाईक चालवणारे स्थानिक लोक करत आहेत. अक्षरशः या रस्त्यांची चाळण झालेली होती .

सणासुदीच्या दिवसात लोकांना जीव मुठीत धरून लोकांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. अशा वेळी जागरूक लोकप्रतिनिधी रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी PWD (अलिबाग ) च्या अधिकाऱ्यांशी या रस्त्याच्या कामा विषयी विचारणा असता त्यांनी सांगितलं कि आमच्या विभागात निधी ची कमतरता आहे. असे कारण सांगितले.

वास्तविक पाहता या विभागात सिडको ने 100% भु- संपादन केलेले आहे. सिडको चे अनेक प्रकल्प या विभागात चालु आहेत. या मध्ये प्रामुख्याने न्हावा -शिवडी सी लिंक, मास हाऊसिंग प्रकल्प, विमानतळ, नेरुळ -उरण रेल्वे मार्ग असे अनेक प्रकल्प या ठिकाणी चालु आहेत. त्यामुळे या रस्त्यांची 100% दुरुस्ती करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यासाठी महेंद्र घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दूरधनी करून या ठिकाणची सर्व परिस्थिती सांगितली. व हा रस्ता लवकरात लवकर सिडको कडे हस्तांतरित करावा अशी मागणी केली.

त्याच बरोबर सिडको चे व्यवस्थापकीय संचालक (MD)संजय मुखर्जी यांच्याशी चर्चा करून गणपतीला अवघे एक दिवस शिल्लक असतांना तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्यास सांगितली.

महेंद्र घरत यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनातर्फे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात आले.त्याबद्दल येथील स्थानिक लोकांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले. त्याच बरोबर सिडको MD संजय मुखर्जी साहेब,जॉईन्ट MD कैलास शिंदे ,चीफ इंजिनियर उलवे गोडबोले , गोसावी यांनी तातडीने या रोड रिपेरिंग कामाला सुरवात केल्याबद्दल यांचेही जनतेने मनापासून आभार मानले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.