Press "Enter" to skip to content

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फिनो पेमेंट तात्काळ सेवा — गौतम जाधव

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

जग दिवसेंदिवस वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार जात असताना बॅंकिंग क्षेत्रात सुध्दा नवनवीन बदल होत आहेत त्यानुसार नागरीकांना याची अधिक माहिती व्हावी याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांना फिनो पेमेंट बॅंकेच्या माध्यमातून तात्काळ सेवा मिळणार असल्याचे बॅंकेचे जनरल हेड गौतम जाधव यांनी सांगितले.

फिनो पेमेंट बँकेच्या उपक्रमांतर्गत डिजिटल बँकिंगला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून भारतीय ग्राहकांसाठी फिटनेस बँकेने शहराच्या विविध भागात फिनो बँकिंगने डिजिटल बँकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा ग्राहकांना अगदी सुलभ आणि साध्या पध्दतीने असल्याने ग्राहकांना कधीही आणि कुठेही पैसे भरता आणि काढता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फिनो पेमेंट बँकेच्या डिजिटल बँकिंगच्या क्यू आर कोड अथवा डेबिट कार्डद्वारे ग्राहक डिजिटल बँकिंग करण्यास सक्षम होणार आहे.यामुळे फिनोचे उद्दिष्ट्य हे ग्राहकांना आकर्षित करणारे आहेत.यामुळे व्यवहार सुनिश्चित करून त्यांच्यातील डिजिटल बँकिंगची भीती आता दूर होण्यास मदत होणार आहे.यामध्ये फिनो पॉइंटसवर ग्राहक नवीन खाते उघडणे, घरगुती पैसे हस्तांतरण करणे, ठेवी मायक्रो एटीएम आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टीम द्वारे पैसे काढणे यासह इतर आरोग्य विमा, पे युटिलिटी बिल आणि लोन ईएमआय या सारख्या सेवांचा लाभ त्वरित मिळणार असल्याने यासर्व व्यवस्थांमुळे नागरीकांचा फिनोवरील विश्वास आता वाढला आहे.

यावेळी मॅनेजर मिलिंद खैरनार मॅनेजर मंगेश घोडके, मयूर झेमसे ,दत्ता मराठे विभूती इंटरप्राईजेस प्रियंका पाटील, हर्षल मात्रे, आशिष भगत, उर्मिला डेठे, आदीसह अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.