Press "Enter" to skip to content

लेबर फ्रंट कर्जत च्या वतीने प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर

कोव्हीड-19 च्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचाऱ्यांची नेमणूक न करण्याची मागणी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कोव्हीड-19 च्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचाऱ्यांची नेमणूक न करण्याबाबत लेबर फ्रंट कर्जत च्या वतीने प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

लेबर फ्रंट कर्जत युनिट अध्यक्ष राहुल डाळींबकर, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, अविनाश पवार, डी. के. गायकवाड आदींनी प्रांत कार्यालय आणि तहसिल कार्यालय येथे जाऊन निवेदन सादर केले.कर्जत नगरपरिषद ही क वर्ग नगरपरिषद असून कर्जत नगर परिषदेच्या 2005 मंजूर आकृतिबंधानुसार 110 पदांची आवश्यकता आहे, परंतु 70 कर्मचारी कार्यरत आहेत, तसेच ज्या प्रमाणे इतर नगरपरिषदांकडे स्वतःचे दवाखाने, स्वतःची शाळा व त्यांचा वेगळा कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे, अशा स्वरूपातील कर्मचारी वर्ग या नगर परिषदेकडे उपलब्ध नाही, उपलब्ध 70 कर्मचाऱ्यांपैकी वर्ग 4 चे 50 कर्मचारी हे साफसफाई, पाणीपुरवठा व अग्निशमन अशा अत्यावश्यक सेवेतील आहेत उर्वरित 20 कर्मचारी पैकी 6 कर्मचारी राज्यस्तरीय संवर्गातील तांत्रिक कर्मचारी आहेत व 14 पैकी 4 कर्मचारी रेल्वे स्टेशन दैनंदिन कोव्हीड-19 कामी कार्यरत आहेत व 2 कर्मचारी गैरहजर व 1 कर्मचारी वरिष्ठ कार्यालयाकडे कार्यरत आहे, उर्वरित कर्मचारी यांच्याकडे कार्यालयीन व इतर कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त भार आहे,व सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हीड संबंधी देखील खालीलपैकी कामे सोपविण्यात आली आहे.

सदर निवेदनात माहे मार्च 20020 पासून कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता दैनंदिन स्वरूपात नागरिक कोरोना या विषाणूने बाधित आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून कंटेनमेंट झोन करणे कामी वर्षभरापासून आजपर्यंत ड्युटी करत आहे, बिना मास वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंडात्मक कारवाई करणे,कर्जत नगरपरिषद कर्मचारी निवडणूक कामी (BIO) म्हणून कार्यरत आहेत.

कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील तसे अन्यत्र ठिकाणाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना लसीकरणाचे 2 डोस घेतले असतील अशा नागरिकांची नोंद घेऊन रेल्वे स्टेशन येथे ड्युटीवर नगर परिषदेचे 4 कर्मचारी कार्यरत आहेत.

कर्जत नगर परिषद स्मशानभूमीमध्ये नगर परिषद कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे,कर्जत नगरपरिषद हद्दीत मा.जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार दुकाने वेळेत बंद करणे कामी नगर परिषद कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. कर्जत नगरपरिषद कर्मचारी हे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाच्या अनुषंगाने देखील काम करीत आहेत. कर्जत नगरपरिषद कर्मचारी हे नगर परिषद क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती ची ड्युटी देखील करत आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी मा.तहसीलदार यांच्यामार्फत नगर परिषद कर्मचारी यांची नियुक्ती न करिता अन्यत्र विभागाकडील कर्मचारी यांची नियुक्ती केली जाते उदाहरणार्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग कोव्हीड संबंधी कामकाज तसेच त्यांचे दैनंदिन कामकाज नगरपरिषद कर्मचारी करीत आहेत व वेळोवेळी सहकार्याची भावना ठेवलेली आहे.

सदर काम करीत असताना काही कर्मचाऱ्यांना कोव्हीड ची लागण देखील झालेले आहे, याकामी त्यांना स्वतःच्या आर्थिक झळ देखील पोहोचलेली आहे सतत मार्च 2020 पासून कोणतीही सुट्टी न घेता नगर परिषद कर्मचारी काम करीत असूनही वारंवार आपणाकडून नव्याने सोपविण्यात येणाऱ्या कामकाजामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होत आहे, त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर व आरोग्यावर परिणाम होत आहे.

तरी या निवेदनाव्दारे आपणास विनंती करण्यात येते की जी कामे आरोग्य अधिकारी यांच्या संबंधित आहेत उदाहरण कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, कोव्हीड-19 संबंधित सर्वेक्षण तसेच तसेच लसीकरणा सारखी वैद्यकीय बाब व इतर कोणती कामे सोपवण्यात येऊ नये अन्यथा लेबर युनियन च्या माध्यमातून नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मागणीच्या अनुषंगाने कामकाज बंद आंदोलन सारखा मार्ग अवलंबावा लागेल त्याच्या होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असे नमूद केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.