Press "Enter" to skip to content

कर्जत उल्हास नदीवरील गणेश घाटाची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडून पाहणी

सिटी| कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगरपररिषद हद्दीतील उल्हास नदीवरील गणेश घाटाची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली.

आज गणरायचे आगमन उद्या दिड दिवसाच्या गणेरायांचे विसर्जन या पार्श्वभूमीवर काल दि.9 सप्टेंबर रोजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी गणेश घाटाची पाहणी केली त्यांच्या समवेत आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, सुनिल लाड आदी उपस्थित होते. गणपती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांची गैरसोय होवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी ही पाहणी भेट होती.

त्यानंतर त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होत्या, कर्जत पोलीस ठाण्यात नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचे त्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर, नगरसेवक विवेक दांडेकर उपस्थित होते. कर्जत शहराच्या बाजारपेठत वाहनांची होणारी कोंडी याबाबत चर्चा झाली शहरातील काही रस्ते वन वे असावेत असे सर्वानुमते ठरले याबाबत कर्जत पोलीस ठाणे सहकार्य करेल असे सांगण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.