Press "Enter" to skip to content

मुसळधार पावसामुळे बोर्ली येथील मच्छिमार बांधवांच्या बोटींचे अतोनात नुकसान

बोर्ली मांडला विभागातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करा ; खासदार सुनील तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात सात आणि आठ सप्टेंबर 2021 या दोन दिवसात जवळपास सहाशे मिलिमीटर च्या आसपास पाऊस पडला.

मुसळधार पावसामुळे बोर्ली मांडला विभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी ओसरल्याने येथील नागरीकांना थोडा दिलासा मिळाला आहे. घरांत पुराचे पाणी गेल्याने नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची खासदार सुनील तटकरे यांनी आज (दिनांक 9 सप्टेंबर 2021)प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नागरीकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. येथील जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.