Press "Enter" to skip to content

अतिवृष्टी काळातील नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार – आ.भरत गोगावले यांची ग्वाही

पोलादपूर तालुकावासीयांनी गणेशोत्सवकाळात कोविडसंदर्भात सतर्क रहाण्याचे आमदार भरत गोगावले यांचे आवाहन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

येत्या गणेशोत्सव काळामध्ये कोविड-19 ची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असून अतिवृष्टी काळात भूस्खलन झालेल्या तसेच महापुरामध्ये वाहून गेलेल्या नळपाणी योजना, रस्ते, विहिरी, शाळा व सरकारी इमारती तसेच खासगी मालमत्ता व शेती आदींच्या नुकसानभरपाईसाठी आपण राज्याच्या महाआघाडी सरकारचा आमदार म्हणून जोरदार पाठपुरावा करीत असल्याची ग्वाही महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली.

पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये घेतलेल्या आढावा बैठकीवेळी आ.गोगावले यांच्यासमवेत प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार दिप्ती देसाई, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समितीचे सदस्य यशवंत कासार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे,डॉ.गुलाबराव सोनावणे, गटविकास अधिकारी जगताप आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी विविध सरपंच, ग्रामसेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी यांनी अतिवृष्टीकाळातील हानीची आकडेवारी आ. गोगावले यांना दिली. यावेळी आ.गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघाचा सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून आपण येत्या काही दिवसांमध्ये महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नुकसानीबाबत सर्वतोपरी प्रयत्न करीत राज्यातील महाआघाडी सरकारकडून मोठया प्रमाणात निधी प्राप्त करून जे गेले ते सर्व नव्याने उभारण्यासाठी आग्रही राहू, असे उपस्थितांना सांगितले. प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी विविध मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर केल्यास आपण व्यवस्थित पाठपुरावा करू, अशी ग्वाही वेळोवेळी आ.भरत गोगावले यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.