Press "Enter" to skip to content

खालापूर मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांची माथेरान ला बदली

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

शेतकरी कुटुंबातून आलेल्या खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांची माथेरान येथे बदली झाली आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये सुरेखा भणगे शिंदे यांनी खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. शिस्त आणि वक्तशीरपणा आणि काम मार्गी लावण्याची तळमळ यामुळे अल्पावधीतच कामाचा ठसा त्यांनी उमटवला. कोरोना काळात खालापूर नगरपंचायत हद्दीत संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी घेतलेली मेहनतीचे जिल्हाधिकारी यांनी देखील कौतुक केले होते.

महड देवस्थान परिसरातील अंतर्गत रस्ता रुंदिकरण सारखा जटिल प्रश्न कौशल्याने सोडवला होता. खालापूर नगरपंचायत हद्दीत कचरा संकलन, पाणी प्रश्न मार्गी लावण्यात मुख्याधिकारी यांचा मोठा वाटा होता. महाड पुरा नंतर खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांसह मदतीसाठी तातडीने सुरेखा भणगे शिंदे स्वतः पोहचल्या होत्या.

कोरोना पहिल्या लाटेत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी उपक्रम सर्वप्रथम मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांनी नगरपंचायत हद्दीत राबविला होता. माथेरान येथे देखील कार्यक्षम मुख्याधिकारी म्हणून छाप पाडतील असा विश्वास खालापूर नागरिकांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.