Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

खरोखरच अडचणीच्या ठिकाणी उभे राहतात तेच खरे पत्रकार!
– माहिती अधिकारी मनोज सानप

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे |

रायगड जिल्हा अलिबाग रेवदंडा येथे रायगड जिल्हा रोहा तालुका येथील सुदर्शन कंपनीच्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्र यांना कोरोना योद्धा म्हणून रेवदंडा येथील सुप्रसिद्ध हॉटेल The Fern Silvanus येथे स्नेहभोजन व सत्कार समारंभ सोहळा ज्येष्ठ पत्रकार संपादक अरुण खोरे, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप व कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या मुख्य उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात आलेल्या सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज आणि पत्रकार बंधू यांचे एक अतूट नाते आहे. गेल्या दीड वर्षांपासून आपण कोरोनाच्या कठीण काळातही पत्रकार आपली सेवा बजावत आहेत. या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच पत्रकारांचा सन्मान करावा आणि स्नेहबंध आणखी दृढ व्हावा, या उद्देशाने पत्रकार बांधवांसाठी छोटेखानी स्नेहमेळावा व संवाद-सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माहिती अधिकारी मनोज सानप यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. अडचणीच्या ठिकाणी उभे राहतात तेच खरे पत्रकार! असे गौरवोद्गार काढले.

त्यातच प्रमुख अतिथी तथा ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे (पुणे) यांनी कंपनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व आभार प्रदर्शनामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके यांनी पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच कंपनीच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख माधुरी सणस यांनी कंपनीचे सामाजिक कार्य आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली.

यावेळी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी ॲड. विशाल घोरपडे, रविकांत दिघे, विवेक गर्ग, रुपेश मारबते, पर्यावरण विभागाचे श्री. नाईक या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.