Press "Enter" to skip to content

शाळा बंद, मात्र शेतकरी वर्गांची शेतीची कार्यशाळा सुरुच

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

एक वर्षाहून अधिक कोरोनांचे सावट सुरु असल्यामुळे अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने होते आहे.शिवाय शाळेय शिक्षण सुद्धा विद्यार्थांना ऑनलाईन घावे लागते.मात्र जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाणारे शेतकरी वर्गांची कामाची शाळा संपतच नाही.शेतकरी बांधावांना शेतात आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून शेती कशी सुजलाम् – सुफलाम् होईल या उद्दात विचारांतून कृषी खात्यांच्या माध्यमातून दुरशेत ( शेमडी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्यामुळे सर्व शेतकरी बांधव विद्यार्थ्यांन प्रमाणे हजेरी लावून शेती विषय आभ्यास जाणून घेतला.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉपसॅप योजनेंतर्गत भातपिकाच्या शेतीशाळेचे आयोजन जननिदेवी मंदिर शेमडी येथे करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जे. एस. आरेकर कृषिविज्ञान केंद्र किल्ला यांनी शेतकऱ्यांना भातपिकाच्या लागवड पद्धती, युरिया ब्रिकेटचा वापर तसेच जास्त युरिया खत वापराचे दुष्परिणाम, भातावरील खोडकिडा, सुरळीतील अळी, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगे, करपा, कडा करपा, आभासमय काजळी, तुडतुडे, लष्करी अळी या सर्व किड व रोगांची महिती देण्यात आली.

यावरील रासायनिक व जैविक उपाय सांगितले तसेच प्रत्यक्ष भात शेतावर जाऊन शेतकऱ्यांना खोडकिडीची अळी कशी असते याची ओळख करून देण्यात आली. कृषी पर्यवेक्षक. एस. डी. धुमाळ यांनी शेतकऱ्यांना अळी व रोगांचे लक्षणे कसे असतात याबद्दल मार्गदर्शन केले. या शेतीशाळा वर्गाचे आयोजन कृषी सहाय्यक आर. बी. आंधळे यांनी केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.