Press "Enter" to skip to content

बोरगांव तलाठी वैशाली बावा यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील बोरगांव तलाठी असणा-या वैशाली बावा यांनी मागच्या एक वर्षोत गावातील बोरगांव, इरानी, आधारणे, वेलोसे, तळवली, तारखोंडा, टेपाची वाडी या अति दुर्गम भागातील सर्व नागरीकांची कामे दररोज कार्यालयात उपस्थित राहून वेळच्यावेळी पुर्ण करून देत असल्याने तसेच त्यांनी शासनाच्या इ पीकपाण्याची माहिती, सातबारा, फेरफार यासह अन्य शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली आहे.

त्यामुळे त्यांच्या कामाचा हजरजबाबीपणा पाहता येथील ग्रामस्थांच्या मनात आपुलकी आणि प्रेम निर्माण झाले मात्र त्यांची अचानकपणे इतर ठिकाणी बदली झाल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बेलकडे, सुधिर पाटील, आधारणे जयवंत पाटील, संगणक प्रशिक्षक प्रविण पाटील आदी ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी बोलतांना तलाठी वैशाली बावा यांनी सांगितले की मी अनेक ठिकाणी काम केले आहे मात्र या गावातील भाई बेलकडे, सरपंच नाना महाडीक, अशोक पाटील, हरेश पाटील, महेश महाडीक, ललित ढाकवल, विजय सांळुखे, प्रविण पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले माझ्या कार्यालयात येणारे नागरीक हे आपलेच आहेत या उद्देशाने मी काम करीत राहिले त्यामुळे या सर्वांचे प्रेम पाहता अधिक काल मला काम करण्याची इच्छा होती मात्र इतर ठिकाणी बदली झाल्यामुळे मला जावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.