सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील नांदगाव व ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी नांदगाव व ओलमण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख भारत डोंगरे, उत्तम शेळके, विभाग प्रमुख रवी ऐनकर, नागेश साबळे, शत्रुघ्न शिंगोळे आदी उपस्थित होते.
यात प्रामुख्याने पंचायत समिती माजी सदस्य चित्रा कारोटे कार्यकर्ते लहू कारोटे, प्रकाश अगिवले,ज्ञानदेव दिघे, शब्बीर भातबर्डे,काशिनाथ झुगरे, जयेश शिंगोळे, संजय कराळे,आशा जोशी, काळुबाई दिघे,साधना मुंढे,विश्वास वाडेकर,विठ्ठल भवारी, रोहिणी जोशी,
सचिन कानडे, दीपक शिद, दुर्गेश फोपे, अरुण कारोटे, अंकुश चिमटे या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment