Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांची समयसूचकता

इलेक्ट्रिक शॉक लागून वायरला चिकटलेल्या साडेचार वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

साडेचार वर्षाचा मुलगा इलेक्ट्रिक शॉक लागून वायरला चिकटला होता,कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांची समयसूचकता दाखवून त्या मुलाचे प्राण वाचवले आहे. जरी राजकारणा मधील स्त्री असली तरी मातृत्वाचे दायित्व हे निसर्गानेच दिलेले असते त्याची प्रचिती त्यांच्या कार्यातून दिसली.

कर्जत तालुक्यातील अरवंद येथे जैन समाजाच्यावतीने गो शाळा चालविली जाते, आज बैल पोळा असल्याने नगराध्यक्षा सुवर्णा जोशी या गोशाळेत गेल्या होत्या, तिथे भेट देवून दर्शन घेऊन त्या कर्जत कडे आपल्या वाहनाने यायला निघाल्या, अरवंद गावाच्या पुढे रस्त्या लगत खूप गर्दी झाली होती काय झाले बघण्यासाठी त्याखाली उतरल्या तर साडेचार वर्षांचा एक बालक इलेक्ट्रिक शॉक लागून वायरला चिकटला होता, त्यामुळे त्याठिकाणी गर्दी होवून आरडाओरड सुरू होती, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी समयसूचकता दाखवून मुलाला लाकडाने बाजूला केले.त्वरित मुलाला व त्याच्या आईला आपल्या गाडीत टाकले, व गाडी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने काढली, दरम्यान गाडीत त्यांनी आईला मुलाला तोंडाने श्वास द्यायला सांगितले तर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मुलाची छाती आपल्या हाताने पंप केली.तेव्हा मुलाने थोडे डोळे उघडले होते.

उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गाडी आल्यावर नगराध्यक्षा जोशी यांनी अधिक्षक आणि बालरोग तज्ञ डॉ. मनोज बनसोडे यांना फोन लावला, ते घाईघाईने खाली आले, त्यांनी मुलाला तातडीने उपचार सुरू केले. आता मुलाची प्रकृती ठीक आहे मात्र त्याला 24 तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवावे लागेल असे डॉ. बनसोडे यांनी सांगितले, आज ते बालक उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे.

साडेचार वर्षाच्या मुलाचे नाव हर्ष रामचंद्र मोडक आहे, आज 6 सप्टेंबर जागतिक मातृ दिन आहे माझ्या हातून साडेचार वर्षाच्या हर्ष चे प्राण वाचले आहेत यापेक्षा अजून काय पाहिजे, अश्या या दिवशी आईला तिचा मुलगा मिळाला आहे यापेक्षा दुसरा आनंद नाही असे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.