सिटी बेल | नागोठणे |
रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी नागोठणे गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वयोवृद्ध बाबासाहेब अधिकारी यांच्या निवास्थानी भेट देऊन त्यांची प्रकृतीची विचारपूस करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
त्यानंतर काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे डॅशिंग नेतृत्व भाषणातील वक्तृत्व मैदानी तोफ ज्यांची संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यांना ओळख असलेले स्वर्गीय निजाम भाई सय्यद यांचे अचानक कोरोना आजाराने नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाऊन स्वर्गीय निजाम भाई सय्यद यांचे बंधू आरिफ सय्यद याकूब सय्यद, मुलगा रमिज सय्यद, पुतणे शाहबाज सय्यद, शाहिद सय्यद, अरमान सय्यद, हाश्मी सय्यद, भाचे अझर शेख, शकील शेख, मानसपुत्र सरफराज शिंदि तसेच सर्व कुटुंबिय सदस्यांचे सात्वन केले.
तालुका अध्यक्ष स्वर्गीय निजामभाई सय्यद धडाडीचे कडाडी नेतृत्व रायगड जिल्ह्यात भाषणातील वक्तृत्व मैदानी तोफ ज्यांची संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांमध्ये ओळख होती. स्वर्गीय निजाम भाई सय्यद कोरोना आजाराने जग सोडून गेले रोहा तालुक्यात काँग्रेस पक्षात त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली अशी खंत नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली.
स्वर्गीय निजाम भाई सय्यद यांच्या कुटुंबीय सदस्यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिलासा दिला. रायगड जिल्हाध्यक्ष सोबत पेण येथील काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड. सौ नंदाताई म्हात्रे, अमीर सय्यद, योगेश मगर, जे डी जोशी, मिलिंद पाडगावकर, मकरंद दाखवा, आदिल पानसरे, अब्रार सय्यद, मन्सूर सय्यद, हिदायतुल्ला झट्टाम तसेच अन्य प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment