Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यातील उसर परिसरातील खैर तस्करीचा अड्डा उद्धवस्त

सिटी बेल | रोहा | समिर बामुगडे |

रोहा तालुक्यात उसर परिसरात खाजगी क्षेञात बेकादेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

उसर परिसरात चालणा-या खैरच्या तोडी बाबत वनविभागाशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला आणि वनविभागाची टिमने जागेवर येऊन खैर तस्करीचा अड्डा उद्धवस्त केला असुन बेकायदेशीर खैर तोड करणा-या व्यापा-यावर गुन्हा दाखल केला तसेच माल सुडकोली विक्री अगार येथे जप्त करुन ठेवण्यात आला.

उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव तसेच अतिक्रमण पथकाचे प्रमुख इच्छात काबळी ,वनपाल गोफण निलेश वाघमारे ,वनरक्षक फिरते पथक अजिंक्य कदम, वनरक्षक तेजेश नरे,वनरक्षक संतोष पिगळा,वनरक्षक वैभव ब-तीसे यानी अवैध वृक्षतोडीचे खैर सोलीव नग ५८घ,मी०,५२५किमत ७३१२ रुपये इतका माल जप्त केला पुढील तपास विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालु आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.