सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी हद्दीतील वावेघर गावाची स्वच्छता करण्याचे काम गावातील महिला बचत गटांनी केल्याने वावेघर गावाचे रुपच पालटले आहे. नवसंजीवनी महिला ग्रामस्थांकडून वावेघर येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.
यासाठी वावेघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी व ग्रामसंघाच्या अध्यक्षा रेश्मा भुपेंद्र माळी, उपाध्यक्षा मनिषा गुप्ता,सचिव अमृता अमित माळी,लिपिक-रश्मी रंजित माळी तसेच गावातील इतर अकरा महिला बचत गटांच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रित येऊन वावेघर गावाची स्वच्छता केली.यावेळी महिलांनी हातात झाडू,घमेले व इतर स्वच्छता साधने घेऊन गावातील रस्ते स्वच्छ केले.
वावेघर येथे महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविल्याने आसपासच्या परिसरातून कौतुक होत असून असे उपक्रम इतर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी राबवून आपला स्वच्छ व सुंदर करावा असे आवाहन उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी यांनी केले आहे.








Be First to Comment