जंजिरा संस्थान काळापासून गुरुचरण असलेल्या व ग्रामपंचायत नावे जुनी नोंद असलेल्या सरकारी गुरुचरणचा व्यवहार
सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |
जंजिरा संस्थान काळापासून गुरुचरण असलेल्या व ग्रामपंचायत नावे जुनी नोंद असलेल्या सरकारी गुरुचरणचा व्यवहार झाल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. सदर सरकारी गुरुचरण वाचवण्यासाठी आज गावाकऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला.
मुरुड तालुक्यातील विहूर गावांत समुद्राला लागून हि जागा आहे. हि जागा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेऊन गुपचूप व्यवहार उरकला गेला. सदर गैरव्यवहार उघड होताच ग्रामस्थांचा संघर्ष सुरु झाला आहे.
मध्यप्रदेश मधील एका व्यावसायिकाने हा व्यवहार केल्याचे कळते. परंतु ग्रामपंचायत विहूर ने याबद्दल सरकार दरबारीं आपली कायदेशीर लढाई सुरु केली आहे.
आज पोलीस बळाचा वापर करून ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला गेला. पण ग्रामस्थ पेटून उठले आणी रस्त्यावर संघर्ष आला.








Be First to Comment