सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
कोव्हिडं19 या विषाणू पासून लढा देण्यासाठी कंत्राटी पध्दतीने भरती करण्यात आलेल्या आरोग्य सेवक यांना निधी उपलब्ध नसल्याने कामावरून कमी करीत प्रशासनाने परत रस्त्यावर आणले आहे.
कामावरून कमी केलेल्या आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटून न्याय मिळावा म्हणून त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांची भेट घेतली.

रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी विविध पदांवर करण्यात आलेल्या नियुक्त्या दि. ३१/८/२०२१ पासुन संपुष्टात आणण्याच्या आदेशा संदर्भात जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे कोरोना काळात कंत्राटी पध्दतीने काम करणा-या कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यावेळी त्यांची भेट त्यांच्याकडून माहिती करून घेतली.तद्नंतर त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांना भेटून कम॔चारी प्रतिनिधी सोबत घेऊन सविस्तर चर्चा केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी देखील तातडीनेरायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचेकडे रायगड जिल्हयातील कोविड परिस्थिती व कम॔चारी कमी केल्यावर होणारी गैरसोय नमुद करून पदे पुव॔वत ठेवण्याचे नमूद करून अहवाल सादर करून कम॔चारी यांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी लागणारे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.

रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी सांगितले की,आयुक्त आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान ,महाराष्ट्र यांचे दि. २७/८/२०२१ रोजीच्या पत्रानुसार केंद्र सरकारने कोविड १९ ECPR -2 बजेट अंतग॔त मनुष्यबळाकरीता लागणारा निधी मंजूर न केल्यामुळे गेल्या दिड वर्षाहून अधिक काळ कोविड १९ अंतग॔त मनुष्यबळ पदभरती अंतग॔त विविध पदांवर करण्यात आलेल्या नियुक्त्या दि. ३१/८/२०२१ पासुन संपुष्टात आणण्याच्या आदेशा संदर्भात जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे कोरोना काळात कंत्राटी पध्दतीने काम करणा-या आरोग्य सेवक यांना कमी करण्यात आले आहे.त्याच्यावर झालेला अन्याय हा दूर होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.








Be First to Comment