वाशी येथील भाजप कार्यकर्त्याचा काॅग्रेस पक्षात प्रवेश
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
मागच्या अनेक काळापासून काॅग्रेस पक्ष जनतेच्या समस्यां सोडविता आला असल्याने सर्व घटकांतील सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष हा काॅग्रेसच आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पेण तालुका काँग्रेस पक्षाची मासिक सभा तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांच्या अध्यक्षतेखाली आज महात्मा गांधी वाचनालयात घेण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब नेने, बापुसाहेब आठवले, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नंदा म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, तालुका चिटणीस निलेश पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माजी सभापती सदानंद म्हात्रे, हिद्दायततुल्ला कुवारे, प्रकाश मोकल आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष अशोक मोकल यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या निधनामुळे काॅग्रेस पक्षाची पोकळी निर्माण झाली ती पोकळी आपल्याला एकत्र येऊन भरून काढायची आहे. त्यामुळे आता पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे आपल्याला चांगले सहकार्य लाभले आहे. येणाऱ्या काळात पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांच्या समस्यां सोडविल्या जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी चंद्रकांत पाटील आणि नंदा म्हात्रे यांची निवड झाल्याबद्दल पेण
तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.तर या कार्यक्रमात वाशी येथील भाजप कार्यकर्तेंसह गडब, कालेश्री येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.








Be First to Comment