Press "Enter" to skip to content

काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा अलिबागला रविवारी पदग्रहण सोहळा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आलेल्या अ‍ॅड.प्रवीण ठाकूर व स्नेहल जगताप यांचा होणार सत्कार

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा पदग्रहण सोहळा व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातील अ‍ॅड. प्रवीण ठाकूर व स्नेहल जगताप यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तसेच विस्तारित कार्यकारणीची बैठक संपन्न होणार आहे.

अ‍ॅड. प्रवीण ठाकूर

यावेळी तालुका, जिल्हा व राज्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कोविड 19 चे नियम पाळून व सामाजिक अंतराचे भान ठेऊन सदर पदग्रहण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांची राहील.

स्नेहल जगताप

सदर कार्यक्रम रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस भवन अलिबाग येथे संपन्न होणार आहे. तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समिती प्रमुख अभिजित पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.