सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोरोना काळात ज्या पाल्यानी आपले छत्र गमावले आहे,त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने सिप्ला कंपनी ने मदत केली आहे.
कोरोना च्या महाभयंकर काळात अंगणवाडी मध्ये शिकत असलेल्या काही लहान मुलांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले आहे, अशा मुलांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी स्वाती चांदेकर खालापूर यांच्या प्रयत्नाने व सिप्ला कम्पनी च्या सहकार्याने कच्चा आहार,धान्य व किराणा देऊन त्यांना मदत केली आहे.खालापूर पंचायत समितीचे उपसभापती विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यापूर्वीही सिप्ला कम्पनिकडून मास्क, सॅनिटायझर वाटप केले आहे.तसेच कोरोना संदर्भात करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
यावेळी कंपनी चे विनायक काळे एचआर प्रमुख, उल्का धुरी सीएसआर प्रमुख, सचिन दळवी,सुनील मकरे, सुपरवायझर शिंदे,पं.स.सदस्य चंद्रकांत कातकरी उपस्थित होते.








Be First to Comment