सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
वाशिवली मुख्य रस्ता ते राजेश साळुंखे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बनविण्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करुन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
वाशिवली गावातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.गावातील रस्ता व्हावा यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती.अखेर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळून रस्त्याचे भूमिपूजन करुन पेव्हर ब्लॉक लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरपंच गौरी गडगे, सदस्य राजेश पाटील, शिवाजी शिंदे, महादेव गडगे,वर्षां पारिंगे, कल्पना ठोंबरे,सरिता गडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment